बीड : प्रतिनिधी
पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हीडीओ व्हायरल करणा-या कैलास फड याच्यासह इतर दोघांना बीड जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला. कैलास फड आणि इतर दोघांचेही पिस्टलचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. अन्य दोघांमध्ये माणिक फड आणि जयप्रकाश सोनवणे यांचाही समावेश असून या तिघांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कैलास फडचा गोळीबार करतानाचा व्हीडीओ सोशल माध्यमावर पोस्ट केला. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी अशा पद्धतीने समाज माध्यमावर दहशत निर्माण करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला. पिस्टलमधून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कैलास फड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटकदेखील झाली होती.