17.8 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंना अभय

धनंजय मुंडेंना अभय

पुराव्याशिवाय राजीनामा नाही, अजित पवारांची भूमिका

मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशीत जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, जोपर्यत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावा मिळणार नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली. त्यातच मला कुणीही राजीनामा मागितला नसल्याचे सांगत खुद्द मुंडे यांनीच चर्चेला पूर्णविराम दिला.

विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करा, अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे सव्वातास चर्चा झाली आणि बीडची स्थिती समोर ठेवली. त्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे. या तीनही चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे दोषी सापडले तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे.

दमानियांचा तीव्र संताप
उपमुख्ममंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. नैतिकतेच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. अजित पवारांवर सिंचन घोटाळ््याचा आरोप झाला, त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता. मग मुंडेंबाबत तीच भूमिका का नको, असा प्रश्न उपस्थित करीत मुंडेंनी राजीनामा द्यावा, म्हणून जनतेनेच लढले पाहिजे, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR