सोलापूर : भाळवणी( ता. खानापूर) भाळवणी येथे भारती विद्यापीठाचे उद्यानविद्या महाविद्यालय,कडेगांव च्या विद्यार्थ्यांनी बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिका मध्ये उद्यानविद्या दूतांनी बीज प्रक्रियेचे महत्व शेतकरी बांधवाना सांगितले तसेच शास्त्रशुद्ध बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले.
या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. या वेळी उद्यान विद्यादूत शंतनू सावंत, सत्येन फडतरे, शुभम पवार, वरदराज यादव, निरंजन साबळे यांनी प्रात्यक्षिक सादर केले.
या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी.जाधव सर, उपप्राचार्य डॉ. वाय.एस.जाधव सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.वाय.ए. सरगर सर, विषयतज्ञ प्रा.व्ही.एस.शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.