जिंतूर/प्रतिनिधी
समाजाने आम्हाला दूर लोटू नये ही आमची अपेक्षा आहे. आम्ही सुद्धा समजाचा एक भाग आहोत ही भावना बाळगा. आम्हाला सहानुभूती नको तर आमचा हक्क हवा आहे, असे प्रतिपादन तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी लढणा-या श्रीगौरी सावंत यांनी केले.
तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार, दि.७ जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त आयोजित समाज आणि मातृत्व या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सावजी कळमकर, प्रमुख पाहुणे म्हणून भावना मुंगसे बोर्डीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, अॅड. मनोज सारडा, प्रताप देशमुख, प्रिया देशमुख, सुरेखा टाले, वैभव वट्टमवार, डॉ.देवराव कराळे, डॉ. रविकिरण चांडगे, पत्रकार विजय चोरडिया, रत्नदीप कळमकर, किशोर देशपांडे, हरीश मुंदडा, धरमचंद अच्छा, रमेश दरगड, डॉ. विवेक थिटे, अॅड.गोपाळ रोकडे, सखाराम चिद्रवार, अरुण शहाणे, सुधीर शहाणे, देवेंद्र भुरे, सत्यनारायण शर्मा, जसपाल राउरी, पवन महेरिया, गोविंद थिटे, सुनील तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या की, तृतीयपंथी नागरिकांच्या पुनर्वसन बाबत राज्य व केंद्र सरकार काहीच करत नाही. राज्य सरकारने सेक्स वर्कर महिलांना आत्मनिर्भर केले पाहिजे. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलायला पाहिजे. या महिलांना बाळंतपणासाठी नव-याचे नाव नसल्याने अंनत अडचणीचा सामना करावा लागतो. आयुष्य ज्याला कळलं आहे तो मदत करतो. मी एकटी या संस्थेची मालक नाही. दुसरी फळी मी तयार करते आहे. मी नसेल तर अनाथ, तृतीयपंथी मुले रस्त्यावर पडता कामा नये. आता मी झाड लावले आहे. त्याचा वटवृक्ष व्हायला अजून अवकाश आहे. समाजाने सगळ्यांना सामावून घ्यावे हीच इच्छा आहे असे सांगितले.
सूत्रसंचालन मो या शेख यांनी तर आभार संघाचे अध्यक्ष शेख शकील यांनी मानले. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.
जेष्ठ पत्रकरांचा करण्यात आला सन्मान
या कार्यक्रमात शहरातील जेष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, निहाल अहमद, एम ए मजीद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर बोरीचे पत्रकार गजानन चौधरी यांची योग संघटनेच्या राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला