20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रदेशमुख हत्याप्रकरणाचे राजकारण

देशमुख हत्याप्रकरणाचे राजकारण

लक्ष्मण हाके सत्ताधा-यांवर कडाडले

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून स्वत:च्या फायद्याचे राजकारण करू पाहत आहेत. ते एका समाजाविरोधात गरळ ओकण्याचं काम करत आहेत. मोर्चे काढत असून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेवेळी बोलत होते.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करत नाही. पण आम्हाला मंत्री होता येत नाही, खासदार-आमदार होता येत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी माणसं तिकडे हवी आहेत. तुम्ही त्यांनाच गुन्हेगार ठरवत आहात. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात आहे. वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध होते. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत.

तुमची माणसे निवडून आणायला वाल्मिक अण्णा चालतो, वाल्मिक अण्णांची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ करायला चालतात. निवडणूक जिंकायला सगळ्यांना वाल्मिक अण्णा चालतात, या गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. निवडणुकीत त्यांच्या स्कीलचा उपयोग करून घेतला जातो आणि आता लक्ष्य करण्यासाठी तुम्हाला फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दिसतात. या माणसांना अडकवलं जात आहे. या गोष्टी ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणा-या असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचे वातावरण तापले आहे. त्यात ओबीसी समाजाने छत्रपती संभाजीनगरमध्ये विराट सभा घेतली. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. शिवाय वाल्मिक कराडचा संबंध शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ओबीसींवरचा अत्याचार दुर्लक्षित
सुरेश धस यांनी बीडला गँग्स ऑफ बीड म्हटलं. निवडणूक होईपर्यंत या माणसाची भाषा एक होती. मात्र निवडून आल्यानंतर यांची भाषा बदलली. ज्यावेळी आंतरवाली सराटीमध्ये अत्याचार झाला, ओबीसींची घरे जाळण्यात आली त्यावेळी गँग्स ऑफ बीड म्हणणा-या सुरेश धसांना हे दिसलं नाही का?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR