17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeसोलापूरजय जवान सैनिकी शाळेचे स्रेहसंमेलन उत्साहात साजरे

जय जवान सैनिकी शाळेचे स्रेहसंमेलन उत्साहात साजरे

सोलापूर : जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर यांचे वार्षिक पारितोषिक व स्रेहसंमेलन सोनी प्रशालेच्या प्रांगणात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर व सोलापूर ग्रामीणचे विभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित माने हे होते. मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वृक्षारोपण करून ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्याचे आवाहन केले तर देवळेकर यांनी अपयश आल्यानंतर खचून न जाता यशासाठी जोमाने तयारी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. माने यांनीही विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात चव्हाण यांनी जीवनात अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नटराजाच्या पूजनाने स्रेहसंमेलनास सुरुवात झाली. गणरायाला वंदन करणारे देवा श्री गणेशा या नृत्याने सर्वांची दाद मिळविली.

कृष्णाचा जीवनपट उलगडणारा कृष्णा थीम टाळ्यांची दाद घेऊन गेला तर शिवरायांच्या नृत्याने माहोलच शिवमय करून टाकला. जय जवानच्या गाण्याने स्रेहसंमेलनाचा समारोप झाला. या कार्यक्रमास प्राचार्य रवींद्र चव्हाण व प्रशालेचे कमांडंट अशोककुमार मनचंदा यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR