सोलापूर : सोलापूर शहर हे विडी उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते या विडी उद्योगातील उद्योजकांनी येथील कामगारांची आर्थिक पिळवणुक करुन त्यांच्या कामाचे हक्काचे शासनाने ठरवून दिलेले मागील २० वर्षांपासून किमान वेतनाचे दर अदा करीत नाहीत. तसेच कामगारांना साप्ताहिक सुटी देत नाहीत.
साप्ताहिक सुटीचे दुप्पट मोबदला देत नाहीत, या गोष्टीमुळे कामगारांना अत्यंत कमी रक्कमेवर राबवून घ्यावयाचे काम विडी कारखानदार मालक वर्गाकडून केले जात आहे. विडी कामगारांना किमान वेतन देत नाही. वरील नमुद विडी कंपनीस सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर मार्फत किमान वेतन अधिनियम १९४८ अन्वये तसेच इतर लागू कामगार कायद्यातंर्गत निरीक्षणे करुन संविधानाने कामगारांना दिलेला अधिकार मिळवून देण्यात यावा याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळी, स्वामीनाथ हेगडे, सुनंदा शहापुरे, वैशाली हागलुर, वर्षा म्हेत्रे, लक्ष्मीबाई रामनपल्ली, आप्माशा शंकर शेट्टी, मिना करदास, नरसम्मा नागेश गड्डम. तसेच अनेक विडी कामगार महिला असंख्य संख्येने उपस्थित होते.