हैदराबाद : समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. समांथाला गेल्या काही दिवसांपासून तिच्या स्वास्थाबाबत समस्या जाणवत आहे. २०२२ मध्ये तिला मायोसिटीस नावाचा आजार झाला होता. अशातच आता समांथाला चिकनगुनिया झाला आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर करत हेल्थ अपडेट दिले आहेत. समांथाला चिकनगुनिया झाल्यामुळे तिचे चाहतेही चिंतेत आहेत.
समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वर्कआऊट करताना दिसत आहे. चिकनगुनियामधून बरी होत आहे”, असं कॅप्शन तिने या व्हीडीओला दिले आहे. चिकनगुनियामुळे सांधेदुखी होत असल्याचे आणि त्यातून बरे होणे ही मजेशीर गोष्ट असल्याचेही समांथाने म्हटले आहे. आजारपणातही समांथाला वर्क आऊट करताना पाहून चाहते थक्क झाले आहेत. अभिनेत्राचा हा व्हीडीओ पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, समांथा ‘सिटाडेल: हनी बनी’ वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजमध्ये तिने एजंटची भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्राइम व्हीडीओवर ही वेब सीरिज प्रदर्शित करण्यात आली होती.