25.8 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रविदर्भात सर्वात मोठी वीजचोरी उघड

विदर्भात सर्वात मोठी वीजचोरी उघड

राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथून चोरीची एक धक्कादायक बातमी समोर आली असून रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल १ कोटी २ लाख २३ हजार ८९४ रुपयांची वीज चोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे. या कारवाईत तडजोडीच्या रकमेपोटी १३ लाख १० हजाराच दंड देखील ठोठविला आहे. संपुर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताज राईस मिलचे शफÞकि अंसारी यांच्या विरोधात रामटेक पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३, सुधारीत २००७ च्या कलम १५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या चोरीच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

महावितरणचे पथक देवलापार येथील ताज राईस मिलचा विजपुरवठा व संच तपासणी करण्याकरिता गेले असता तेथे विज वापराची नोंद होण्यासाठी असलेल्या थ्री फेजच्या औद्योगिक विज मीटरला महावितरणचे सील नव्हते, सोबतच अतिरिक्त केबल जोडून वीज पुरवठा सुरू होता. या सर्व प्रकाराची योग्य शहानिशा करून ग्राहकाने अवैधरीत्या विज पुरवठा घेत मागील १२ महिन्यांच्या कालावधीत ४ लाख ९० हजार ३२ विज युनिटचा अवैध वापर करून तब्बल १ कोटी २ लाख २३ हजार ८९४ चे महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे.

मॅग्निज चोरीच्या वाहनासह दोघांना अटक
चिखला माईन्सच्या प्रतिबंधित क्षेत्रातून मॅग्नेजची चोरी करून त्याची वाहतूक करणा-या दोघांना पोलिसांनी नाकाबंदी करून अटक केली आहे. या कारवाईत विनानंबरची काळ्या रंगाची महिंद्रा गाडी आणि २० प्लास्टिकच्या पिशव्यांमधील काळा मॅग्नीज असा सुमारे ४ लाख रुपयांचा हा मुद्देमाल गोबरवाही पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील हिरापूर हमेशा गावाजवळ पोलिसांनी केली. आकाश नागपुरे (२४) रा. नाकाडोंगरी आणि जाफर शेख (३४) रा. चिखला या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांना गोबरवाही पोलिसांनी अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR