24.4 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeसोलापूरमाधुरी दिसताच ‘बजाओ रे’!

माधुरी दिसताच ‘बजाओ रे’!

सोलापूरकरांकडून स्वागत, 'धक धक गर्ल'च्या सौंदर्याची जादू कायम

सोलापूर : काळ्या कपड्यातील बाउन्सरनी गेटवर केलेली साखळी रस्त्यावर आणि दुभाजकावर तळपत्या उन्हात वाट पाहत थांबलेले चाहते.. गर्दीतून पुढे सरकणारी वाहतूक आणि पोलिसांची कसरत… काही वेळातच धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचे आगमन होताच फटाके आणि ढोल-ताशांचा दणदणाट झाला… चाहत्यांना पाहून स्मितहास्य करीत त्या म्हणाल्या, देखा है पहेली बार.. सोलापूर के आँखो में प्यार. सोलापूर शहरात एम्प्लॉयमेंट चौकातील सराफ दालनाच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या.

माधुरी दीक्षीत उद्घाटनाला येणार याची माहिती मिळतात चाहत्यांनी दालना बाहेर रस्त्यावर हजेरी लावली. परंतु या चाहत्यांना बाउन्सर आणि पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले. माधुरी दीक्षित येणार म्हणून चाहत्यांनी रस्त्यावर गर्दी केली. माधुरीला पाहायला सकाळी दहा वाजल्यापासून गर्दी होऊ लागली. पोलिसांना एकेरी वाहतूक करून द्यावी लागली. दुस-या बाजूला तिच्या चाहत्यांनी गर्दी केली.

आता येणार, थोड्या वेळाने येणार, तासाभराने येणार.. नक्की येणार असे सांगून निवेदिकेने चाहत्यांमधील उत्सुकता टिकवून ठेवली. चक्क दुपारी २.४२ वाजता आगमन झाले. ‘सर्वांनी तिच्या कारभोवती गर्दी केली. पोलिसांनी चाहत्यांना बाजूला करीत वाटत करून देत दालनात आणेपर्यंत सात मिनिटे लागली.चाहत्यांमधला उत्साह वाढविण्यासाठी निवेदिकेने यावेळी अंताक्षरी स्पर्धा घेतली. अनेक महिलांनी साजन, तेजाब, बीस साल बाद अशा अनेक चित्रपटातील गाणी सादर करून वातावरण निर्मिती केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR