19.7 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeलातूरडॉ. कल्याण बरमदे संपादित दोन वैद्यकीय पुस्तकांचे प्रकाशन

डॉ. कल्याण बरमदे संपादित दोन वैद्यकीय पुस्तकांचे प्रकाशन

लातूर : प्रतिनिधी
येथील ख्यातनाम वंध्यत्व निवारण तथा  स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांनी संपादित केलेल्या दोन वैद्यकिय पुस्तकांचे प्रकाशन मुंबई येथे सुरु असलेल्या ६७ व्या अखिल भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांच्या परिषदेत थाटात करण्यात आले.डॉ. कल्याण बरमदे व डॉ. प्रियांकुर रॉय संपादित ‘मॅन्युअल ऑन प्रिझर्व द युटेरस’ अर्थात ‘गर्भपिशवी वाचवण्याचे उपाय’ आणि डॉ. कल्याण बरमदे व डॉ. ऋचा शर्मा संपादित ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अँड फॉलोअप केअर’ या दोन वैद्यकिय पुस्तकांचे  प्रकाशन  भारतीय  प्रसूती आणि स्त्रीरोग संघटनेचे  अध्यक्ष डॉ. जयदीप टांक, डॉ. माधुरी पटेल, डॉ. हृषिकेश पै, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ.परिक्षित  टांक  आणि डॉ. सुवर्णा खाडिलकर आणि फॉग्सी कार्यालयाचे पदाधिकारी यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात मौलिक योगदान देणा-या डॉ. कल्याण बरमदे यांचे या पुस्तक प्रकाशनाच्या अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR