बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महिन्याभरात आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. राखेची वाहतूक करणा-या टिप्परने त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते सौंदना गावचे सरपंच होते. मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात की घात आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.
सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे दुचाकीवरून जात असताना मिरवट फाट्यावर हा अपघात झाला. अभिमन्यू क्षीरसागर यांना राखेची वाहतूक करणा-या टिप्परने धडक दिली. ते खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना महिनाभरात दुस-या एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, पुढील तपास बीड पोलिस करीत आहेत. राखेचा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा घात की अपघात आहे, अशी शंका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केली आहे.