19.3 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रसोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली परवानगी

मुंबई : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी सुरुच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचे आदेश केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिले आहेत.

यापूर्वी ही खरेदी आजपर्यंत म्हणजे १३ जानेवारी पर्यंत करण्याचे होते निर्देश होते. आता सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री चौहान यांना फोन करत मुदतवाढ देण्याची मागणी केला होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतक-यांना फायदा होणार आहे. अनेक शेतक-यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळे हमीभावात शेतक-यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंहे चौहान यांनी हा निर्णय घेतला आहे.

फडणवीसांनी मानले आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यांनी कृषीमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा देखील केली होती. ही मागणी तातडीने कृषीमंत्री चौहान यांनी मान्य करत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचा अतिशय मनापासून आभारी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR