22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रनायलॉन मांजाने चिरला पीएसआयचा गळा

नायलॉन मांजाने चिरला पीएसआयचा गळा

नायलॉन मांजाने चिरला पीएसआयचा गळा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये काळजाचा ठोका चुकणारी घटना घडली आहे. ड्युटीवर जाणा-या पोलिस अधिका-याचा (पीएसआय) नायलॉन मांजाने गळा चिरला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती गंभीर असल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातून जात असताना ही घटना घडली. जखमी पोलिसाचे नाव दीपक पारधे असे आहे. ते आज नोकरीवर निघाले होते, त्याचवेळी मांजामुळे गळा चिरला गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय दीपक पारधे हे सध्या ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. आज सकाळी ते ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. सातारा परिसरातील सुधाकर नगर भागात त्यांच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला. त्यामुळे गळा चिरला अन् रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

नायलॉन मांजा वापरला तर गुन्हा
संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवणा-या प्रत्येकावर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांचे लक्ष असणार आहे. पतंग उडवताना जर तुम्ही नायलॉन मांजाचा वापर करत असाल तर तातडीने तुम्हाला पोलिस ताब्यात घेतील आणि गुन्हाही दाखल करतील. नायलॉन मांजा बाळगणा-यांना पकडण्यासाठी १८ पथके तैनात आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, गल्ल्यात तसेच पतंगाच्या सर्व दुकानांत नायलॉन मांजा तपासला जात आहे.

आतापर्यंत ५० गुन्हे दाखल, १० जण ताब्यात
छत्रपती संभाजीनगर शहरात नायलॉन मांजामुळे गेल्या काही दिवसांत ३५ जणांना गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. याच कालावधीत पोलिसांनी ५० गुन्हे दाखल केले आहेत, तर १० जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात नायलॉन मांजा बाळगणा-या तब्बल ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR