मुंबई : श्रद्धा कपूरच्या ‘नागिन’ चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माता निखिल द्विवेदी यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक संकेत दिला.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की श्रद्धा कपूर ‘नागिन’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने निखिल द्विवेदीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटाच्या पटकथेची झलक दिसते आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘नागिन ऍन एपिक टेल ऑफ लव्ह अँड सॅक्रिफाईस’ असे लिहिले आहे. या फोटोमधून असे दिसत आहे की या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. त्याचीच माहिती निखिल द्विवेदी यांनी चाहत्यांसह शेअर केली आहे.
चित्रपटाचे काम आता सुरू होणार आहे. गेल्या वर्षी एका मुलाखतीत निखिल द्विवेदी म्हणाले होते की, श्रद्धा कपूर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यांनी असेही सांगितले होते की, चित्रपटाचे चित्रीकरण २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.