25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडामी अजून खेळू शकलो असतो

मी अजून खेळू शकलो असतो

आर. अश्विनचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या दरम्यान भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने निवृत्तीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला. टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबद्दल उघडपणे बोलला आहे.

दरम्यान, आर. अश्विनने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे सामने पार पडले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विन याने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. त्याला शेवटचा सामना न खेळता निवृत्ती घ्यावी लागली यावेळी चाहते देखील निराश झाले होते.

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबद्दल उघडपणे बोलला. तो म्हणाला, माझ्या क्रिकेटमध्ये अधिक ताकद होती. मी आणखी क्रिकेट खेळू शकलो असतो, पण जेव्हा लोक तुम्हाला ‘का नाही’ विचारतात, तेव्हा तुम्ही ‘निवृत्ती का घेतली’ हे विचारण्याऐवजी. अशा प्रकारे खेळ संपवणे चांगले.

अश्विनने असेही सांगितले की, तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीबद्दल जास्त बोलत नाही कारण काही काळापूर्वी तो स्वत: त्या गटाचा भाग होता. अशा परिस्थितीत त्याला आपल्या सहका-यांचे मनोधैर्य खच्ची करायचे नव्हते. आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो अजूनही आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जने त्याला मोठ्या रकमेत विकत घेतले आहे. याशिवाय तो क्लब क्रिकेटही खेळू शकतो. मात्र, जोपर्यंत तो भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही तोपर्यंत तो रिटायर्ड प्लेअर्स लीगमध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत तो कोणत्या स्थितीत आहे हे आयपीएल २०२५ च्या कामगिरीनंतर दिसेल. त्याचा फॉर्म चांगला राहिल्यास चेन्नई सुपर किंग्ज त्याला पुढील हंगामातही कायम ठेवेल. जर तो चांगला खेळला नाही तर त्याला सोडले जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR