25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमानसोपचारतज्ज्ञांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

मानसोपचारतज्ज्ञांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

तज्ज्ञाच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला!

नागपूर : प्रतिनिधी
एका ४५ वर्षीय मानसोपचारतज्ज्ञाला त्याच्याकडे समुपदेशनासाठी येणा-या तरुणी आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मानसोपचारतज्ज्ञ गेली अनेक वर्षे नागपुरात समुपदेशन केंद्र चालवत होता. तो नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भातील शिबिरेही घेत होता.

त्यापैकीच काही अल्पवयीन मुली आणि तरुणींचे त्याने विविध आमिषे दाखवून लैंगिक शोषण करत आरोपी या अल्पवयीन मुली आणि तरुणींचे आक्षेपार्ह फोटो, व्हीडीओही स्वत:कडे संग्रहित ठेवायचा आणि त्याच्या आधारे पुढेही त्यांना ब्लॅकमेल करायचा.

दरम्यान, सध्या धावपळीच्या युगामध्ये मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी करिअरसंबंधी अडचणींबद्दल समुपदेशन घ्यायला नागपूर येथील मानसोपचारतज्ज्ञांकडे येत. आरोपी डॉक्टरने दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडे येणा-या एका तरुणीला तिचे त्या काळचे काही फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या सबंधित तरुणीने हिम्मत करून पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा पहिल्यांदा या विकृत मानसोपचारतज्ज्ञाच्या अनेक वर्षांच्या दुष्कृत्याचा भांडाफोड झाला.

पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवत आरोप लागलेल्या मानसोपचारतज्ज्ञाला पॉक्सो आणि लैंगिक छळाच्या आरोपात अटक केली होती. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास केला, तेव्हा मिळालेले पुरावे आणखी धक्कादायक होते.

पोलिसांनी हार्ड डिस्क जप्त केली
पोलिसांनी आरोपी मानसोपचारतज्ज्ञाच्या कार्यालयातून एक हार्ड डिस्क जप्त केली असून त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो, व्हीडीओ आढळल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आरोपी मानसोपचारतज्ज्ञाने आजवर अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR