मुंबई : इमर्जन्सी या चित्रपटातून मागील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून यात एका नेत्याचा प्रवास दाखविला असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमर्जेन्सी या चित्रपटाच्या विशेष शो दरम्यान केले.
इमर्जेन्सी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, चित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.
माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या सर्वांसाठी महान आहे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की देशात लावण्यात आलेली आणीबाणी ही आपल्या देशासाठी काळी रात्र होती. त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान गुंडाळून ठेवले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणीबाणी हा एक असा क्षण आहे. ज्यात प्रत्येक मनुष्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते. या लोकशाहीवर आलेल्या संकटाची माहिती जोपर्यंत देशाच्या नागरिकांना सांगणार नाही, तोपर्यंत त्यांना देशाची किंमत कळणार नाही, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या चित्रपटाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भूमिका अतिशय उत्तम रंगवली आहे.