19.3 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रबीडच्या आष्टीत दोन सख्ख्या भावांची हत्या

बीडच्या आष्टीत दोन सख्ख्या भावांची हत्या

बीड जिल्हा पुन्हा हादरला तिसरा जखमी, चार ताब्यात

आष्टी : तालुक्यातील वाहि-या गावाच्या परिसरात दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. (गुरुवारी) रात्री ही घटना घडली असून यामध्ये अन्य एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले आहे.

गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले अशी मृतांची नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते.

गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही. दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, बाबुराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलिस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे, अमोल शिरसाठ यांनी भेट देत मोठ्या शिताफिने सात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्­यान या प्रकरणी अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR