17.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeमनोरंजनअखेर जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ ७ मार्चला प्रदर्शित होणार

अखेर जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ ७ मार्चला प्रदर्शित होणार

मुंबई : ‘द डिप्लोमॅट’ सिनेमात जॉन अब्राहमसोबत अभिनेते कुमुद मिश्रा, शरीब हाश्मी, सादिया खतीब हे कलाकार झळकणार आहेत. ‘द डिप्लोमॅट’ हा सिनेमा ७ मार्च २०२५ ला रिलीज होणार आहे. जॉन अब्राहम आपल्याला २०२४ मध्ये आलेल्या वेदा सिनेमात दिसला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला तरी जॉनच्या अभिनयाचे कौतुक झाले.

आता ‘द डिप्लोमॅट’ सिनेमातून जॉनच्या अभिनयाची चमक कशी दिसणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. जॉन अब्राहमचा बहुचर्चित आगामी सिनेमा म्हणजे ‘द डिप्लोमॅट’. या सिनेमाचे पहिले पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. तेव्हाच या सिनेमाची चर्चा सुरु झाली होती. आता ‘द डिप्लोमॅट’ सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरवर जॉन अब्राहमचा डॅशिंग लूक दिसून येतोय. या सिनेमाच्या रिलीजला मुहुर्त मिळाला असून रिलीज डेट जाहीर करण्यात आली. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे.

‘द डिप्लोमॅट’ सिनेमाची कहाणी काय?
जॉन अब्राहम या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. जॉन या सिनेमात एका भारतीय राजदूताची भूमिका साकारणार आहे. हा भारतीय राजदूत पाकिस्तानात असलेल्या एका भारतीय मुलीला परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो. या मुलीला पाकिस्तानात जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले जाते. ही एक सत्य घटना असून ‘द डिप्लोमॅट’ सिनेमात ती कशी रंगवली जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR