बीड : बीडच्या अंबाजोगाईत हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गोळीबार करण्याचा उद्देश नेमका काय होता? यासाठी पोलिस घटनास्थळी पोहचली. अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा कायम चर्चेत आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तर काल आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता बीडच्या अंबाजोगाईत जमिनीच्या वादातून मोरेवाडी परिसरात हवेत गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बीडमध्ये असलेल्या अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात आज दुपारी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आला, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेनंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचून तपास करीत आहेत. मोरेवाडी परिसरात नेमके काय घडले?, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.