कौसडी : जिंतूर पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन बेलखेडा या ठिकाणी करण्यात आले होते. या तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेत कौसडी येथील जि.प. प्रशाला माध्यमिक गटातून मुलीच्या संघाने सहभाग नोंदवला होता. यात कौसडी येथील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक तालुकास्तरावर पटकावत घवघवीत यश मिळवले.
तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेच्या मुलीच्या संघासाठी मार्गदर्शक क्रीडा शिक्षक दशरथ भिसे व ज्ञानेश्वर बर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापीका सुनिता गांजरे, सहशिक्षिका सुरेखा खरटमोल, वंदना रेवतकर, मीरा कुंभारे, सपना वैद्य, हजरा शेख, सहशिक्षक सारिका कदम, गजानन पांचाळ, गणेश काळे, मनोज भालेराव, अभिजित मोरे, कुंडलिक राठोड, उषा शेळके मावशी यांनी यशस्वी मुलींच्या संघाचे अभिनंदन करून कौतुक केले.
कौसडी प्रशालेच्या मुलींच्या संघाने तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेत घवघवीत यश मिळवल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.