19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरश्री भगवान परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात

श्री भगवान परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात

ह. दे. प्रशालेच्या मैदानावर रंगले तरुण आणि ज्येष्ठांचे सामने बक्षीस वितरण जल्लोषात

सोलापूर : श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त येथील हरिभाई देवकरण शाळेच्या मैदानावर श्री भगवान परशुराम जन्मोत्सव प्रतिष्ठान आयोजित श्री भगवान परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेचे जल्लोषात बक्षीस वितरण झाले. समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवत जल्लोष केला स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव प्रतिष्ठानचेसल्लागार राम तडवळकर, रवी हलसगीकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, उपाध्यक्ष निशिकांत खेडकर, सचिव श्रीकांत कुलकर्णी, सहसचिव रमण कुलकर्णी, सदस्य अमृता गोसावी, अँड ऊर्मिला जहागीरदार, बजरंग कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, ऋषीकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शनिवारआणि रविवार असे दोन दिवस या स्पर्धेचा थरार झाला. एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. क्रिकेट स्पर्धांना समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. दोन दिवस खेळाडूंच्या चहा, नाश्ता, जेवणाचीही सोय प्रतिष्ठानने केली होती. परशुराम प्रिमिअर लीग भूषण पोतनीस व परशुराम प्रिमिअर लीग संतोष कुलकर्णी या दोन टीममध्ये अंतिम सामन्याचा थरार झाला. आठ षटकांच्या या सामन्यात पोतनीस टीमने कुलकर्णी टीमसमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुलकर्णी टीममधील धनराज गोखले यांनी ४९ धावा ठोकून सामनावीराचा किताब पटकावला. त्यांना सुनील देशपांडे व त्यांच्या नंतर आलेल्या स्मण कुलकर्णी यांनी चांगली साथ दिली. अखेर अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात संतोष कुलकर्णी यांच्या टीमने विजय मिळवला. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले.

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव प्रतिष्ठानकडून याच मैदानावर समाजातील ज्येष्ठ व हौशी नागरिकांसाठी पाच घटकांचा सामना खेळवला गेला. त्यात समाजातील राम तडवळकर, रवी हलसगीकर, प्रशांत बडवे, प्रशांत कुलकर्णी, बजरंग कुलकर्णी, निशिकांत खेडकर, राजन कामत, नागेश जोशी, संतोष पंतोजी, ऊर्मिला जहागीरदार, पृथा हलसगीकर, सुनीता कुलकर्णी, स्मिता पाठक, अमृता गोसावी, परिणिता कुलकर्णी आदीनी उत्साहात सहभाग घेऊन क्रिकेटचा आनंद घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR