लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते दि. २१ जानेवारी रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी औराद शाहजनी येथील भंडारे मित्र परिवाराच्या वतीने माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांचे छायाचित्र असलेल्या व नूतन वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या जाणता राजा २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पंढरी भंडारे, नंदू भंडारे, ओम भंडारे यांच्यासह भंडारे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.