नवी दिल्ली : इंग्लंड क्रिकेट टीम २०२५ या भारत दौ-यातील पहिला टी २० सामना बुधवारी २२ जानेवारीला खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कोलकातामधील इडन गार्डनमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. जॉस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा आहे. इंग्लंडने सामन्याच्या २४ तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आपण तयार असल्याचं दाखवून दिले.
तर टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन ही सामन्याआधी टॉस नंतरच स्पष्ट होईल. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी देणार? याकडे याबाबत सर्वांना उत्सूकता आहे.
विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन हा खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे ध्रुव जुरेलला प्रतिक्षा करावी लागेल. संजू आणि अभिेषेक शर्मा ही जोडी सलामीला येईल. त्यानंतर तिलक वर्मा तिस-या स्थानी येईल. तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विस्फोटक खेळी केली होती. त्यामुळे तिलककडून इंग्लंडविरुद्धही अशीच खेळी अपेक्षित असणार आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव येऊ शकतो. पाचव्या आणि सहाव्या स्थानी रिंकू सिंह आणि हार्दिक पंड्या खेळण्याची शक्यता आहे. उपकर्णधार अक्षर पटेल सातव्या स्थानी येऊ शकतो.
तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये २ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकीपटू असू शकतात. त्यानुसार मोहम्मद शमी याचं वर्षभरापेक्षा अधिक कालावधीनंतर कमबॅक होऊ शकतं. तसेच अर्शदीप सिंह खेळण्याची शक्यता आहे. तर फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि वॉशिंगटन सुंदर या चौघांना मैदानाबाहेर राहावे लागू शकते.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई .