बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मोक्का अंतर्गत कोठडीत असणा-या वाल्मिक कराड याची सात दिवसांची सीआयडी कोठडी आज संपली. त्यानंतर पुन्हा वाल्मिक कराड याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात येणार होते.
दरम्यान, बीड सरपंच हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड कोर्टात सुनावणी झाली. खंडणी व मकोका या दोन्ही गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुन्हा वाल्मिक कराड याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात येणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणात्सव ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे झाली. बुधवार ११वाजताच्या सुमारास बीडच्या विशेष जिल्हा न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आले. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या चालू असून प्रमुख आरोपी वाल्मिक कराडवर सध्या सगळ्यांचंच लक्ष केंद्रीत झाले आहे. वाल्मिक कराडचं एक सीसीटीव्ही फूटेज नुकतंच समोर आलं असून त्यात खंडणी मागण्यासाठी जाताना वाल्मिक कराडसोबत इतर आरोपीही दिसत आहेत.