बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळेला ‘वॉण्टेड’ घोषित केले असून शिवाय आरोपी आंधळेची माहिती देणा-याला पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केले आहे.
दरम्यान वाल्मिक कराडला ५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कराड बीड पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे. मात्र, देशमुख यांच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशातच आता बीड पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळेला ‘वॉण्टेड’ घोषित केले असून शिवाय आरोपी आंधळेची माहिती देणा-याला पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केले आहे. हत्येच्या दिवसापासून कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी फरार असून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.