20.8 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमनोरंजनराम गोपाल वर्मांना ३ महिन्यांचा तुरुंगवास

राम गोपाल वर्मांना ३ महिन्यांचा तुरुंगवास

मुंबई : वृत्तसंस्था
राम गोपाल वर्मा यांना मुंबईतील एका न्यायालयाने ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध चेक बाऊन्स प्रकरणाची सुनावणी सात वर्षांपासून सुरू होती, ज्यासाठी आता त्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

दरम्यान, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्मांना ७ वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सुनावणीदरम्यान हजर न राहिल्याबद्दल न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध नॉन वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय त्यांच्या ‘सिंडिकेट’ या नवीन प्रकल्पाच्या घोषणेपूर्वी आला आहे. राम गोपाल वर्मा यांना मुंबईतील एका न्यायालयाने ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध चेक बाऊन्स प्रकरणाची सुनावणी सात वर्षांपासून सुरू होती, ज्यासाठी आता त्याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

३.७२ लाख रुपये भरपाई द्यावी लागेल
टीओआयच्या वृत्तानुसार, न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत आरोपी म्हणून मानले आहे. या प्रकरणात, न्यायालयाने राम गोपाल यांच्याकडून तक्रारदाराला ३.७२ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. या सगळ्या प्रकरणामुळे चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR