19.5 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeमहाराष्ट्रअजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

अजित पवारांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

पुणे : नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील सुमारे ५० गावांतील विविध पक्षांतील पदाधिका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात. त्यामुळे लक्षपूर्वक काम करा, असे आवाहन अजित पवारांनी पदाधिका-यांना केले आहे. शिबिरामध्ये जनमानसात प्रतिमा चांगली असेल असा विचार मांडला होता त्यानुसारच पक्षात नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नांदेड जिल्ह्यात आणि शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीकडून सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सर्व घटकांतील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला चांगले यश मिळाले आहे. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता आपली जबाबदारी त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

कार्यकर्ते हालते ठेवा
पक्षाचे कार्यकर्ते कामात हालते ठेवले पाहिजेत, त्या पद्धतीने पक्षाकडून कामाचे स्वरूप तयार केले जाणार आहे. तसे कार्यक्रमही दिले जाणार आहेत. आम्ही फक्त राजकारणच करत नाही तर सर्व घटकांच्या काय समस्या आहेत, हेही जाणून घेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR