नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थ संकल्पाच्या रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत तुफान वाढ झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात किंमतीत मोठी घसरण झाली. तर त्यानंतर दरवाढीचा आलेख दिसून आला. सोने १२०० रुपयांनी वधारले. तर चांदी ३ हजारांनी उसळली. ऐन अर्थसंकल्पाच्या दिवशीच दोन्ही धातुत मोठी वाढ झाली.
मागील दोन आठवड्यात सोन्यात ३००० रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे १७० आणि ३२० अशी ४९० रुपयांची घसरण झाली. तर २९जानेवारीला सोने ९२० रुपयांनी, तर ३१ जानेवारी रोजी १३१० रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने ७७,४६० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८४,४९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदी लाखाच्या उंबरठ्यावर
चांदीने या महिन्यात दरवाढीला ब्रेक लावला असला तरी अनेकवेळा मोठी झेप घेतली. या २४ जानेवारीला १ हजारांची दरवाढ तर २७ जानेवारीला १ हजारांची घसरण झाली. त्यानंतर ३० जानेवारी रोजी चांदी २ हजारांनी वधारली. ३१ जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ९९,६०० रुपये इतका आहे.