30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeराष्ट्रीयमेडिकल कॉलेजमध्ये ७५ हजार जागा वाढवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

मेडिकल कॉलेजमध्ये ७५ हजार जागा वाढवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज मोदी सरकारच्या तिस-या सत्रातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामण यांचा हा आठवा अर्थसंकल्प आहे. करात सूट, मध्यमवर्ग, महिला आणि शेतक्षेत्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. दरम्यान सर्वात जास्त लक्ष होतं ते शेतक-यांसाठी होणा-या घोषणांकडे. शेतक-यांना विनाक्रडीट कर्ज देणा-या किसान क्रेडीट कार्डची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात देखील मोठी घोषणा करण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षीपासून मेडिकल कॉलेजमध्ये ७५ हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

अर्थसंकल्पाचे वाचन करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, ‘विकासदर वाढवणे, खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे तसेच मध्यमवर्गीय वर्गाला ताकद देणे यावर सरकारचा भर असणार आहे. पुढील ५ वर्षांमध्ये विकासाच्या संधी निर्माण करणे, तसेच सरकारचे लक्ष हे आरोग्य आणि रोजगारावर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल.’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR