35.9 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअब्जाधीश बिल गेट्स वयाच्या ६९ व्या वर्षी पुन्हा प्रेमात!

अब्जाधीश बिल गेट्स वयाच्या ६९ व्या वर्षी पुन्हा प्रेमात!

 

सॅनफ्रान्सिस्को : वृत्तसंस्था
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची नवीन गर्लफ्रेंड पॉला हर्ड सोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे. मी भाग्यवान आहे की मला एक गंभीर मैत्रीण आहे, पॉला, असे गेट्स यांनी सांगितले. आम्ही चांगला वेळ घालवत आहोत, ऑलिम्पिकला जात आहोत आणि ब-याच छान गोष्टी करत आहोत.
२०२३ पासून बिल गेट्स पॉला हर्डच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे आणि दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. बिल गेट्स यांनी २०२१ मध्ये मलिंदा गेट्स यांच्यापासून घटस्फोट घेतला. अवघ्या दोन वर्षांनंतर ते पॉलासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.

पॉला हर्ड या ओरॅकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हर्ड यांचे २०१९ मध्ये कर्करोगाने निधन झाले. पॉलाला मार्कपासून कॅथरीन आणि केली या दोन मुली आहेत. पॉला यांच्या पतीने त्यांना सुमारे $५०० दशलक्ष किमतीची मालमत्ता सोडली. पॉला यांनी टेक्सास विद्यापीठातून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली आहे. पॉला हर्ड नॅशनल कॅश रजिस्टर नावाच्या कंपनीत काम करत होत्या. पॉला यांनी शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांनाही भरपूर देणगी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR