29.2 C
Latur
Saturday, February 8, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे पोलिस दलात खळबळ!

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील तपास पथकाचे प्रमुख असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिका-याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, लोणावळा पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. अण्णासाहेब बादशाह गुंजाळ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा गुंजाळ हे खडकी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते खडकी पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख अधिकारी होते. तीन दिवसांपासून ते गैरहजर होते. पोलिस ठाण्यात येत नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण, संपर्क होऊ शकला नव्हता. मात्र, त्याचवेळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी गुंजाळ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR