सोलापूर : घरगुती जेवण किंवा हॉटेल, रस्त्यावरील हातगाडे, भजी, समोरे, वडापावचे विविध स्टॉल्सवर वारंवार तेलाचा वापर केला जातो. घरगुती वापरात वारंवार वापराचे प्रमाण कमी असले तरी हॉटेल्स, रस्त्याच्या बाजूला असलेल्या हातगाड्यांवर पदार्थ विकणाऱ्यांमध्ये एकच तेल वारंवार वापरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अशा खाद्य तेलाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, एथेरोस्क्लेरोसिस, अल्झायमर, यकृत रोग होण्याचा संभव असतो.
अन्नपदार्थ वारंवार तळलेल्या तेलात पुनः तळल्यास त्याचे गुणधर्म बदलतात. त्याचे सेवन केल्यास अनेक आजार होऊ शकतात. . ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, एफएसएसएआयने एकूण टीपीसी मर्यादा २५ टक्के निश्चित केली आहे. या पुढे खाद्यतेलाचा वापर केला जाऊ नये, असेही आवाहन अन्न प्रशासनाने केले आहे. तेलातून निळा राखाडी धूर दिसतो किंवा कडक फेस तयार होतो किंवा तेल गडद आणि घट्ट होते किंवा तेलाची सुसंगतता बदलते त्यामुळे वारंवार तेलाचा वापर करणे टाळावे, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
दोनपेक्षा जास्त वेळा एकाच तेलाचा तळण्यासाठी वापर केल्यास तळताना धूर-जाळ निघतो. विशिष्ट वास येतो. शिवाय हे तेल आरोग्यासाठी धोकादायक असते, दोनपेक्षा जास्त वेळा एकाच तेलाचा तळण्यासाठी वापर केल्यास तळताना धूर-जाळ निघतो. विशिष्ट वास येतो. शिवाय हे तेल आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे आरोग्य बिघडते.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून हॉटेल किंवा अन्न विक्रेत्यांकडे भेटी देऊन तपासणी केली जाते. यामध्ये एक यंत्र तेलात बुडवून टोटल पोलर काउंट (टीपीसी) पाहिला जातो. यामध्ये टीपीसी रीडिंग २५ पेक्षा जास्त नोंदवला गेल्यास तेल वापरण्यासाठी योग्य नसल्याचे सिद्ध होते.