प्रयागराज : सोमवारी दुपारी प्रयागराज महाकुंभ मेळा परिसरात पुन्हा एकदा आग लागली. सेक्टर-८ मधील आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे.
श्री कपी मानस मंडळ आणि ग्राहक संरक्षण समितीच्या छावणीत आग लागली. दोन्ही छावण्यांमध्ये प्रत्येकी दोन तंबू जळाले आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद कुमार शर्मा म्हणाले – ही एक छोटीशी आग होती. ती ताबडतोब नियंत्रणात आणण्यात आली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सेक्टर-८ मध्ये माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. सेक्टर-८ मध्ये माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली.
आज पुन्हा महाकुंभात मोठी गर्दी आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ९२.५० लाख भाविकांनी स्रान केले होते. प्रयागराजचे सर्व ७ प्रवेश पॉईंट जाम झाले आहेत. गर्दीमुळे, दर्यागंज येथील संगम स्टेशन २६ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहे. महाकुंभात तैनात असलेल्या अधिका-यांची ड्युटी २७ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. जत्रेच्या परिसरात वाहनांचा प्रवेश पुन्हा बंद करण्यात आला आहे. सर्व प्रकारचे पास रद्द करण्यात आले आहेत. प्रयागराजमधून जाणा-या १९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. संगमच्या १०-१२ किमी आधी बांधलेल्या पार्किंगमध्ये वाहने थांबवली जात आहेत, त्यामुळे लोकांना पायी संगमला जावे लागत आहे.
काशी तमिळ संगमसाठी काशीला आलेले तामिळनाडूचे पाहुणे सोमवारी महाकुंभात पोहोचले. सर्वांनी एकत्र संगमात स्रान केले. आज महाकुंभाचा ३६ वा दिवस आहे. १३ जानेवारीपासून ५३.८८ कोटी भाविकांनी संगमात स्रान केले आहे.
महिन्याच्या आत ५ वी घटना
– १९ जानेवारी: सेक्टर १९ मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली; या अपघातात १८० कॉटेज जळून खाक झाले.
– ३० जानेवारी: सेक्टर २२ मध्ये आग लागली ज्यामध्ये १५ तंबू जळाले.
– ७ फेब्रुवारी: सेक्टर-१८ मध्ये आग लागली. शंकराचार्य मार्गावर ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये २२ मंडप जळाले.
– १५ फेब्रुवारी: सेक्टर १८-१९ मध्ये आग लागली.
– १७ फेब्रुवारी: सेक्टर-८ मध्ये आग लागली. लवकरच यावर नियंत्रण मिळवण्यात आले.