बँकॉक : थायलंडमधील भीषण बस अपघातात १४ जण ठार झाले असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत असे वृत्त आहे. पचुआप खिरीखान प्रातांत ही दुर्घटना घडली आहे.
प्रचुआप खीरी खान प्रांतात मध्यरात्री साडेबारा वाजता बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बस थेट झाडावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की, बसचा पुढील भाग अर्धा तुटला होता. तत्काळ मदतकार्य राबविण्यात आले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे निवेदन थायलंड प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.