29.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रआरोप झाल्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

आरोप झाल्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

अण्णा हजारे पुन्हा एकदा सक्रीय नाव न घेता केली राजीनाम्याची मागणी

राळेगणसिद्धी : समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या ९० व्या दिवशी पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. अण्णा हजारे यांनी आरोप होणा-या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी अण्णा हजार यांनी कोणाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख आरोप होणा-या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी म्हटले की, मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी सर्वात प्रथम राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते. कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. आरोप असणा-या लोकांना मंत्रीमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळात घेताना कोणाला घेऊ नये, हे सुद्धा ठरवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे कृषीमंत्री असलेले शशिकांत सुतार, सिंचन खात्याचे मंत्री असलेले महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शोभा फडणवीस यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

अण्णा हजारे मंत्र्यांना उद्देशून म्हणाले, तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार? देश कुठे जाणार आहे. मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणसुद्धा पदावर राहू नये. लगेच राजीनामा दिला पाहिजे. आरोप होताच मंत्र्यांनी प्रथम राजीनामा देवून बाहेर पडले पाहिजे. माझे वय ९० वर्ष झाले आहे. या ९० वर्षांचा वयात एकसुद्धा डाग नाही. तसेच जीवन मंत्रिमंडळातील लोकांनी जगले पाहिजे. त्यामुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान होते.

सार्वजनिक जीवनात असणा-या लोकांना त्यांचे नेहमी आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे. सुरवातीला हे चुकत आणि नंतर अशा घटना घडतात. त्यामुळे राज्याचे, देशाचे आणि समाजाचे नुकसान होते, त्याचा विचार करणे गरजेच असल्याची प्रतिकिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR