बीड : प्रतिनिधी
उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, पोलीस उप अधीक्षकांसह काही पोलीस अधिका-यांच्या बदल्या आणि कृष्णा आंधळेच्या अटक यासह एकूण ८ ते ९ मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आता अन्न त्याग आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा काढली जाणार आहे.
या आंदोलनाबद्दल बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, गावक-यांनी बैठक घेतली होती. त्यात सर्वानुमते अन्न त्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. त्यात ८ ते ९ मागण्या आहेत. उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, कृष्णा आंधळेला अटक कधी करणार, अशा मागण्या आहेत. त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी असणार आहे.
गावक-यांचे शिष्टमंडळ बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे. त्यात मी सुद्धा असणार आहे. या मागण्यांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करू”, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
या अन्न त्याग आंदोलनात गावकरी साखळी पद्धतीने सहभागी होतील. या ठिकाणी जितक्या लोकांची व्यवस्था असेल, तितके लोक पहिल्या दिवशी इथे बसतील. त्यात पुरुष महिला असतील. याचं नियोजन संध्याकाळी गावकरी करणार आहेत”, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
काँग्रेस काढणार यात्रा
काँग्रेसचे नवनियुक्ती प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मस्साजोग ते बीड यात्रा काढणार असल्याचे त्यांनी धनंजय देशमुख यांना सांगितले.ह्यााबद्दल बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, ते आले. आमचं सात्वंन केलं. विचारणा केली की, आमची एक संकल्पना आहे. त्या संकल्पनेवर तुमचं मत काय आहे. आम्हाला सात्वंनेसाठी कोण आलंय, हे बघितलं नाही. बघणार नाही. त्यांनी गावक-यांसोबत चर्चा करून सद्भावना यात्रेबद्दल कळवू. यात न्यायाची भूमिका घेण्याबद्दल आम्ही त्यांना मागणी करणार आहोत.