24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रपरळी, बारामती येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय सुरू करणार

परळी, बारामती येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय सुरू करणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील परळी आणि पुणे जिल्ह्यात बारामती येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालये स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. या दोन्ही महाविद्यालयांसाठी बांधकाम, वेतन व अनुषंगिक बाबींसाठी प्रत्येकी ६७१ कोटी ७७ लाख रुपये खर्चाच्या तरतूदीसही मंजूरी देण्यात आली आहे.

नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी बीड जिल्ह्यातील परळी येथे ७५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर बारामती तालुक्यातील महाविद्यालयासाठी क-हावागज येथे ८२ एकरची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ८० विद्यार्थी इतकी असणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांसाठी प्रत्येकी २७६ पदांना मंजूरी देण्यात आली असून त्यामध्ये शिक्षक संवर्गातील ९६, शिक्षकेतर संवर्गातील १३८ तर बा स्त्रोताद्वारे भरावयाच्या शिक्षकेतर संवर्गातील ४२ पदांचा समावेश आहे.

तसेच महाविद्यालयांसाठी प्रत्येकी मनुष्यबळ वेतन व कार्यालयीन खर्चासाठी पुढील पाच वर्षांसाठी १०७ कोटी १९ लाख रुपायाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविद्यालय इमारत, उपकरणे, यंत्र सामुग्री व अनुषंगीक बाबी खरेदी करणे, वाहन खरेदी, शेड बा पाणीपुरवठा, विहीर, विंधन विहीर आदी बाबींच्या खर्चाच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR