29.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रशिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वारगेट एसटी स्टँड आवारात ही घटना घडली असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला बळजबरीने बसमध्ये ओढून नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही सर्व घटना मंगळवारी रात्री घडल्याचे समोर आले असून पोलिसांनी रात्रीच एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

स्वारगेट परिसरात नेहमी ब-यापैकी वर्दळ असते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा या परिसरातील गर्दी कमी झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री महिला शिवशाही बसच्या जवळून जात असताना तिला संशयित आरोपीने बळजबरीने आत ओढून घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR