मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट ही मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केले. वाल्मीक कराडला ही ट्रिटमेंट मिळण्यामागे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर आज विजय वडेट्टीवार यांनी देखील वाल्मीक कराडला मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट ही मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळत असल्याचे म्हटले.
ते म्हणाले की, वाल्मीक कराड याला कोणताही त्रास तुरुंगात होता कामा नये असा आदेश धनुभाऊंचा असेल, त्याच्याशिवाय कराडला अशी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळूच शकत नाही. त्यामुळेच मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी होत असेल तर ती पूर्ण व्हायला हवी. अन्यथा या आरोपींना शिक्षा होणार नाही. सध्या या प्रकरणातील आरोपींना अभय देण्याचे काम सुरू आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले.