25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
HomeUncategorized३८ दिवसांत ५ राष्ट्र प्रमुखांना ट्रम्प यांची धमकी!

३८ दिवसांत ५ राष्ट्र प्रमुखांना ट्रम्प यांची धमकी!

भारत, इंग्लंड, फ्रान्स ते झेलेन्स्की! स्वाभिमानी राष्ट्रप्रमुखांची ट्रम्प यांच्या दादागिरीला बगल, अमेरिकेचा फायदा की नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
डोनाल्ड ट्रम्प दुस-यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्याच्या ३८ व्या दिवशी व्हाईट हाऊसच्या इतिहासात कधीही घडले नव्हते असे घडले. ओव्हल ऑफिसमध्ये मीडियाच्या कॅमे-यांसमोर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यामुळे अमेरिकेला फायदा होईल की नुकसान? असा प्रश्न जगभर चर्चेत आहे. इस्रायली पंतप्रधानांव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांशी कठोर शब्दांत संवाद साधला. ट्रम्प यांना त्यांच्या कठोर वृत्तीने दाखवायचे आहे की ते शीर्षस्थानी आहेत. बाकीच्या देशांना त्यांच्यापुढे झुकावे लागेल.

१. जॉर्डनच्या राजाला धमकी
११ फेब्रुवारीला जॉर्डनचे राजे अब्दुल्ला व्हाईट हाऊसमध्ये आले. ट्रम्प यांनी किंग अब्दुल्ला यांना खडे बोल सुनावले, आम्ही गाझावर नियंत्रण ठेवणार आहोत आणि पॅलेस्टिनींना गाझा सोडून इतर सुरक्षित ठिकाणी स्थायिक केले जाईल. अमेरिका जॉर्डन आणि इजिप्तला भरपूर पैसे देते, जर त्यांना त्यांची योजना मान्य नसेल तर त्यांची मदत बंद केली जाऊ शकते. जॉर्डनच्या राजाने अपमान टाळत म्हटले की, फक्त आपल्या देशासाठी जे चांगले आहे तेच करेल.

२. भारताला दरवाढीची धमकी
१४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी-ट्रम्प यांची बेकायदेशीर इमिग्रेशन, टॅरिफ आणि बिघडलेल्या भारत-अमेरिका संबंधांमध्ये भेट झाली. पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी ट्रम्प व्हाईट हाऊसच्या गेटवरही आले नाहीत. ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, भारत हा जगातील सर्वाधिक टॅरिफ असलेला देश आहे. तुम्ही जे काही दर लावाल, मी तेच दर लावेन. मी प्रत्येक देशासोबत हेच करत आहे. या दौ-यात पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त मुद्यांचे वर्चस्व राहू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

३. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी वाद
२४ फेब्रुवारी रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी ट्रम्प भिडले. म्हणाले की, युरोप युक्रेनला कर्ज देत आहे अमेरिकेने युक्रेनला युद्ध लढण्यासाठी ‘खरा पैसा’ दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र मॅक्रॉन यांनी त्यांचा हात धरून थांबवले आणि म्हणाले, खरं सांगू, आम्ही पैसे दिले आहेत, युरोपने या युद्धात ६० टक्के खर्च केला आहे. स्पष्टपणे सांगायचे तर अमेरिकेने कर्ज, हमी, अनुदान दिले, पण खरा पैसा युरोपने दिला.

४. ब्रिटन रशियाशी स्पर्धा करू शकेल?
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारर यांनी ट्रम्प यांना विचारले की, जर ब्रिटीश सैन्य युक्रेनमध्ये तैनात असेल तर अमेरिका त्यांना मदत करेल का? ट्रम्प प्रथम ‘नाही’ म्हणाले. ते म्हणाले की, इंग्रज स्वत:ची चांगली काळजी घेऊ शकतात. थोड्याच वेळात ते म्हणाले की, तुम्ही एकट्याने रशियाचा सामना करू शकाल का? स्टारर याला उत्तर देऊ शकले नाहीत आणि हसत राहिले.

काही वेळाने एका पत्रकाराने केयर स्टारर यांना कॅनडाविषयी प्रश्नही विचारला. यावर ट्रम्प संतापले आणि त्यांनी संभाषण मध्येच थांबवले. स्टारर म्हणाले की, आम्ही सर्वात जवळचा देश आहोत आणि आमच्यात आज खूप चांगली चर्चा झाली, पण आम्ही कॅनडाला हात लावला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR