25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रनैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

संदीप क्षीरसागर पुन्हा आक्रमक

बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख प्रकरणांमध्ये मुख्य सुत्रधार वाल्मिक कराडच आहे. धनंजय मुंडे म्हणतात वाल्मिक कराड माझा निकटवर्तीय आहे. घटनाक्रम बघितला तर घुलेला कराडने फोन कधी केला, हे सगळं समोर आले आहे. त्यामुळे मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड समोर आला आहे. परिणामी आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा.असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील चार्जशीटमध्ये पहिल्या क्रमांकाचा आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच याविषयी पुन्हा एकदा विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

सभागृहमध्ये विषय झाल्यानंतर जे कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाही की त्याचा गुन्हा दाखल करायला २४ तास लावले, संरक्षण देण्याचा त्याला प्रयत्न केला. महादेव मुंडे प्रकरणात सुद्धा न्याय मिळावा, असा आता सगळ्यांना वाटत आहे.

त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे सुद्धा आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांना सुद्धा वाटतं या प्रकरणातील आरोपीला सुद्धा शिक्षा मिळवी. पोलीस अधिका-यांचे सीडीआर समोर आणले तर सगळेच आणखी अजून समोर येईल. वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी कोण प्रयत्न करत होतं? कोण दबाव टाकत होतं? हे सुद्धा समोर येईल, असेही आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान, परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे या आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्या आहेत. परळीतील महादेव मुंडे यांचा १६ महिन्यांपूर्वी परळी तहसील परिसरात खून झाला होता. यातील आरोपी अद्यापही अटक नाहीत. त्यामुळे यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे उपोषण करत आहेत. पोलीस अधीक्षकांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. मात्र तरी देखील अद्याप यातील एकाही आरोपींना अटक झालेली नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोग ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR