31 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रआता खोदून खोदून गोष्टी बाहेर काढणार: दमानिया

आता खोदून खोदून गोष्टी बाहेर काढणार: दमानिया

बीड : अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रि­पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता तर मी आणखी गोष्टी खोदून काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

दमानिया म्हणाल्या, राजीनामा दोन महिन्यांपूर्वीच घ्यायला हवा होता. पण आता मी गोष्टी खोदून खोदून काढणार आहे. खंडणीची बैठक धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या शासकीय निवासस्थानी झाली होती. तिथले आता टॉवर लोकेशन काढून मी आता हा विषय पुढे नेणार आहे, असे दमानिया यांनी सांगितले.

अंजली दमानिया यांना अश्रू अनावर
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, या हत्याकांडाचे फोटो पाहून मी झोपू शकले नाही. मला रात्री अडीच वाजता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा मेसेज आला होता. ते मला म्हणाले, ताई आता मला हे बघवत नाही. मी आता काहीतरी निर्णय घेणार आहे. ही सर्व हकीकत सांगताना दमानिया यांना अश्रू अनावर झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR