27.8 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeलातूरपशुगणनेमध्ये लातूर राज्यात प्रथम

पशुगणनेमध्ये लातूर राज्यात प्रथम

लातूर : प्रतिनिधी
शासनाने विहित केलेल्या कालावधीत २१ वी पशुगणना पूर्ण करून लातूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील १० तालुक्यातील ९४१ गावे व १९८ शहरी वॉर्ड असे १ हजार १३९ गावे व वॉर्ड येथील पशुगणना पूर्ण झाली आहे. ही पशुगणना करत असताना काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या त्रुटी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानानुसार पूर्ण करण्यात येणार आहेत.
लातूर जिल्ह्यातील ५ लाख १६ हजार ३४८ कुटुंब, २ हजार १४९ कौटुंबिक उद्योग, ४ हजार २९१ बिगर कौटुंबिक उद्योग व ६ हजार ५३० संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रगणकांनी ४ मार्च रोजी पशुगणना पूर्ण केली. लातूर जिल्ह्यातील १८१ प्रगणक, ३५ पर्यवेक्षक, १३२ संस्था प्रमुख, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन,पशुधन विकास अधिकारी विस्तार,  तसेच संपूर्ण पशुसंवर्धन विभागाने मेहनत घेतली. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनामुळे पशुगणना कार्यवाही गतीने पूर्ण झाली. लातूर विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे यांनी नियमित वारंवार क्षेत्रीय स्तरावर व ऑनलाइन बैठकीद्वारे मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. गाव व तालुका स्तरावर काम पूर्ण केलेल्या कर्मचा-यांचा सत्कार करून कार्यक्षमतेला प्रोत्साहन दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR