मुंबई : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील जोगेश्वरी भागात १२ वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहते. २४ फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यावर ती बेपत्ता झाली होती. पीडित मुलीचे काका चालक आहेत. त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.
यातच पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिची चौकशी केली असताना तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी तातडीने जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पीडित मुलीच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी ५ नराधमांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी एसी दुरुस्त करणारे आहेत. जमाल, आफताब, महफूज, हसन आणि जाफर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.