23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रतुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?

तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?

भय्याजी जोशींचे समर्थन सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल

मुंबई : विद्याविहारमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(आरएसएस) नेते भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, मुंबईत येणा-या प्रत्येकाला मराठी शिकलेच पाहिजे असे नाही, असे वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केले होते. त्यानंतर, अधिवेशन सभागृहातही त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळाले. तर, शिवसेना आणि मनसेच्या दोन्ही ठाकरे बंधुंनी भय्या जोशींवर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून, भय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरेंना बंधुंना डिवचले असून भय्याजी जोशींच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज ठाकरेंच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या, स्वत:ची लेकरे कॉन्व्हेंटमध्ये शिकवतात अशा शब्दात सदावर्तेंनी ठाकरेंवर बोचरी टीका केली.

भय्याजी जोशी यांचा भाषेवरील अभ्यास खूप मोठा आहे. या देशात कुठेही भाषेची सक्ती करणे गैर आहे, विविध भाषा हे या देशाच्या सौंदर्याचे प्रतिक असून देशाच्या सहिष्णूतेचे दर्शन त्यातून होते असे म्हणत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. संविधानानुसार भय्यूजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, भाषेची सक्ती करणे हे मुघली विचारांचे प्रतिक आहे असेही सदावर्ते यांनी म्हटले.

दरम्यान, सदावर्ते यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. ठाकरेंनी भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला, तुमची मुले कुठल्या शाळेत शिकली, असे सदावर्ते यांनी म्हटले.

मला असे वाटतय की, जेमतेम म्हणजे एखादे कार्टुनिस्ट असलेले तुम्ही कलाकार आहात, तुम्ही भाषेचे ज्ञानी नाहीत. तुम्ही लिफ्ट करुन राजकारणी झाला आहात. राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, त्याची मला किव येते. मला हे सांगा राज ठाकरे, तुमची जी मुलं आहेत, तुमच्या ज्या औलादी आहेत, त्या कोणत्या शाळेत शिकल्या? असा सवाल करत गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. तुमची लेकरे, कॉन्व्हेंट, आयबीडीपीमध्ये शिकतात आणि तुम्ही दुस-याला सांगता ही भाषा शिका, ती भाषा शिका, अशा शब्दात सदावर्ते यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR