मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर १७ टक्के आमदारांनी चर्चेत सहभाग घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मात्र, हे सांगत असताना त्यांनी नाना पटोले चर्चेत सहभागी झाले नसल्याचे दाखवर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनाही मधे खेचले.
नानाभाऊं चर्चेत सहभाग घेतला नाही की काँग्रेसनेसुद्धा नानाभाऊंचे नाव कापले? नानाभाऊ आमच्या विदर्भाचा बुलंद आवाज आहे. तो दाबण्याचा कोणी प्रयत्न करत असले तर ते बरोबर नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. नानाभाऊ आमचा बुलंद आवाज असल्याचे म्हणत फडणवीसांनी म्हटले की, गेल्या चार दिवसांपासून ते रंगीबेरंगी कपडे घालून येत होते. त्यामुळे ते सध्या वेगळ्या मुडमध्ये आहेत का? असे वाटत होते. आज ते पुन्हा एकदा पांढ-या कपड्यात आल्याचे देखील फडणवीसांनी म्हटले.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की ते कोल्हापूर दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले की शक्तिपीठ महामार्गाला शेतक-यांचा विरोध नसलेले १ हजार स्वाक्ष-यांचे निवेदन मला देण्यात आले आहे. तसेच बाधित शेतक-यांची परिषदे देखील घेण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीवर राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यामुळे गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कामांची सुरुवात आपण केलेली आहे. फडणवीसांनी विरोधकांना टोला लगवताना म्हटले की धुल चेहरे पे थी और वो आईना साफ करते रहे. संवाद हवा. मात्र, तो एकतर्फी असून चालत नाही.