लातूर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या मार्गदर्शनात लातूर महानगरपालिकेत महिला कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. मनपा उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव होते. उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, मुख्य लेखापरिक्षक कांचन तावडे, मुख्य लेखाअधिकारी रावसाहेब कोलगणे, सहाय्यक आयुक्त निर्मला माने यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी प्रमुख व्याख्यात्या म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयातील डॉ. स्वाती फेरे यांनी मार्गदर्शन केले. महिलांचे आरोग्य या विषयावर त्यांनी विचार मांडले. या यावेळी डॉ. फेरे यांच्या हस्ते उपस्थित महिला कर्मचा-यांचा रोपटे व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नंदकिशोर तापडे, खदीर शेख, मुख्य लेखा परीक्षक कांचन तावडे, पर्यावरण अधिकारी सन्मती मेस्त्री यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी शिंदे तर आभार लक्ष्मण जाधव यांनी मानले.