लातूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित पशुप्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या प्रदर्शनातील विजेत्या पशु पालकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, बोधनकर डी. यु., श्रीधर शिंदे नानासाहेब सोनवणे सर्व पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद तसेच देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, सुरेश गोजमगुंडे, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे, राजेंद्र पतंगे, माधव बन यांच्या प्रमुख उपस्थितीत पशु प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात एक वर्षावरील देवणी नर वळू गटामधून औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथील सिद्राम सरवदे यांच्या वळूने प्रथम क्रमांक पटकावला.लाल कंधारी मादी गट (गाभण गाय )या गटातून अहमदपूर तालुक्यातील शेनकुड येथील देविदास नरवटे यांच्या गाईने प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
देवणी नर वळू गटासाठी लातूर बाजार समितीच्या वतीने चांदीचा रथ, प्रमाणपत्र, शाल व फेटा देऊन सन्मान करण्यात आला. लाल कंधारी मादी गटातील विजेत्या पशुपालकास देवस्थानच्या वतीने रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सचिव सतिश भोसले, बाळासाहेब पाटील, ओम गोपे, महादेव बन, शिवानंद कातले यांची प्रमुख उपस्थिती होती.